"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: av:Хиндистан
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४५:
 
'''भारत''' [[दक्षिण आशिया]]मधील एक प्रमुख [[देश]] आहे. जगातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा हा देश क्षेत्रफळाने जगातील [[जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)|७वा सर्वांत मोठा]] देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत [[जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)|दुसऱ्या क्रमांकावर]] आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. [[भाषा]], [[ज्ञान]], [[अध्यात्म]], [[कला]], [[धर्म]] या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधातील]] ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.
==नाव==
 
विश्वामित्र ऋषींची मेनका या अप्सरेपासून झालेली कन्या शकुंतला. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता. त्यांचा पुत्र म्हणजेच पराक्रमी '''[[सम्राट भरत|भरत]]'''. यावरून हिंदुस्थान देशाला '''[[भारत]]''' हे नाव पडले असा एक गैरसमज आहे. खरा इतिहास असा आहे :- स्वायंभुव मनूची पत्‍नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती, त्यांचा पुत्र प्रियव्रत. प्रियव्रताच्या सात पुत्रांतल्या एकाचे नांव अग्निध्र. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा पुत्र नाभि. नाभीची पत्‍नी मेरुदेवी. त्यांचा पुत्र ऋषभदेव. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्‍नी इंद्रकन्या जयंती. त्यांचा पुत्र भरत. हा‘जडभरत’ या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला. पुढे मोंगलांनी देशाचे नाव हिंदुस्थान केले. हे नाव सुरुवातीला भारताच्या उत्तरेकडील प्रदेशाचे होते. पुढे ते नाव सर्व भारताला मिळाले. इ.स. १९५०मध्ये हिंदुस्थान देशाची नवी राज्यघटना अंमलात आल्यानंतर देशाचे नाव अधिकृतपणे इंडिया अर्थात भारत असे झाले.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले