"महिला वकील अधिवेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्स या संस्थेचे राज्यस्तरीय '''महि...
(काही फरक नाही)

१४:०६, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्स या संस्थेचे राज्यस्तरीय महिला वकील अधिवेशन २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत नाशिक येथे भरले होते. ’स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन न्यायाधीश सुजाता मनोहर यांनी केले. प्रमुख पाहुणे आंतराष्ट्रीय महिला वकील संघटनेच्या अध्यक्षा शीला अनीश, न्या.साधना जाधव, बार काउंन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, न्या.रोशन दळवी, न्यायमूर्ती बी.एन. देशमुख, डॉ. सीता भाटिया, पुष्पा भावे, काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मदन मिश्रा, नाशिकचे महापौर यतीन वाघ, लोकमत दैनिकाच्या प्रतिनिधी दीप्ती राऊत, राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षा शांताकुमारी, ॲडव्होकेट सीमा सरनाईक वगैरे आले होते. अधिवेशनाला अमळनेर, अहमदनगर, कराड, जळगाव, ठाणे, धुळे, पनवेल, परभणी, पुणे, मालेगाव, रायगड, संगमनेर,सातारा आदी जिल्ह्यांतून महिला वकील आल्या होत्या.

अधिवेशनात झालेले कार्यक्रम

पहिल्या दिवशी : महिलांविषयीचे कायदे, प्रागतिक न्यायनिर्णय आणि समान नागरी कायदा यांवर विचारमंथन
दुसऱ्या दिवशी : प्रसार माध्यमे आणि स्त्रीविषयक अनिष्ट दृष्टिकोन यावर चर्चासत्र.