"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
ज्याने कोणतेही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस(पारितोषिक), पदक, चषक(करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल, स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते. ज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. अनेक संस्था आणि त्यांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्‍न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागत नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड भ्रष्टाचारी राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने, प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकीर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.
 
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, [[रावबहादुर]], किंवारायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. मात्र या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.
 
=पुरस्कारांचे प्रकार=
ओळ ३०:
==कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती==
 
* [[अर्जुन पुरस्कार]] : पहा सरकारी पुरस्कार
* आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : [[फैय्याज]]
* भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. [[श्रीराम लागू]]
* [[खेलरत्‍न पुरस्कार]] : पहा सरकारी पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले