"बाबाराव मुसळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''बाबाराव मुसळे''' हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या ...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

२२:१६, १७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

बाबाराव मुसळे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली.

बाबाराव मुसळे हे कवीदेखील आहेत. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी अशा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत घेत व्यक्त होते.

बाबाराव मुसळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • इथे पेटली माणुस गात्रे (कवितासंग्रह-काव्याग्रह प्रकाशन-जून २०११)
  • झुंगु लुखू लुखू (कथासंग्रह)
  • दंश (कादंबरी)
  • नगरभोजन (कथासंग्रह)
  • पखाल (कादंबरी)
  • पाटीलकी (कादंबरी)
  • मोहोरलेला चंद्र (कथासंग्रह)
  • वारूळ (कादंबरी)
  • हाल्या हाल्या दुधू दे (कादंबरी)

पुरस्कार

  • ‘इथे पेटली माणुस गात्रे’ला शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार