"नीलेश साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. नीलेश साबळे हे मराठीतले एक विनोदी नट आहेत. मूळचे पुणे जिल्ह्य...
(काही फरक नाही)

००:०३, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

डॉ. नीलेश साबळे हे मराठीतले एक विनोदी नट आहेत. मूळचे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातले असलेले नीलेश साबळे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विद्यापीठाअंतर्गत सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली आहेत. त्यानंतरही नकला, सूत्रसंचालन, एकपात्री प्रयोग, लघुपट याद्वारे नीलेश साबळे अभिनयक्षेत्रात झळकत राहिले. ‘झी' मराठी वरील एका स्पर्धात्मक मालिका कार्यक्रमात ते ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार' झाले. त्यानंतर याच वाहिनीवरील ‘फू बाई फूऽऽ' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून ते पुढे आले. "नान्याच्या गावाला जाऊ या' या मालिकेतही ते चमकले आहेत.

पुरस्कार

  • पुणे जिल्हा परिषदेचा कलावंत पुरस्कार(२०१०)

हेही पहा : पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार