"बाळ बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''बाळ बापट''' ऊर्फ श्रीकृष्ण बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक गा...
(काही फरक नाही)

१२:३८, ३० जुलै २०१२ ची आवृत्ती

बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म यवतमाळ येथे १७-८-१९२३ला झाला होता. मॅट्रिक झाल्यावर बाळ बापट यांनी छायाचित्रणाचे शिक्षण घेतले. आणि नंतर, चलचित्र छायालेखन व चित्रपट तंत्र या क्षेत्रांत प्रवेश केला. पुण्यातील नवयुग स्टुडिओमध्ये त्यांनी, ’गरिबांचे राज्य’, ’शादीसे पहिले’ व ’साजन का घर’ या चित्रपटांचे छायालेखन केले. राजा परांजपे यांच्या ’आधी कळस मग पाया’, ’ऊन पाऊस’, ’जगाच्या पाठीवर’, ’पेडगावचे शहाणे’, ’लाखाची गोष्ट’ आदी चित्रपटांचे कॅमेरामन, बाळ बापट होते.

भारत सरकारच्या फिल्म डिव्हिजनमध्येही बाळ बापट यांनी काही काळ नोकरी केली होती.

बाळ बापट २९-७-२०१२ रोजी निधन पावले. ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट हे त्यांचे चिरंजीव आहेत.

लेखन

  • माझी चित्रफीत (चित्रपटक्षेत्रातील अनुभवांचे आत्मकथन)


पहा : नावात बाळ