"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरण केले.
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
* करजो, देजो, पायजो ही आज्ञार्थी रूपे आहेत.
* 'मी जावासीन ना तो मरावासीन'(मी गेलो आणि तेव्हाच तो मेला) ही सामान्य क्रियापदाची वेगळी रचना या बोलीत आढळते.
 
==झाडीबोलीतील काही खास शब्द==
 
शेतीचा माल इकडून तिकडे नेण्याकरिता जे साधन वापरतात त्यास '''‘बंडी'''' असे संबोधले जाते. अन्यत्र हाच शब्द पुरुषाच्या अंगातील अंतर्वस्त्राकरिता वापरत असले, तरी गोंडी व माडिया
या आदिवासींच्या भाषांसह दक्षिणेतील तामीळ, तेलगू, मल्याळम इत्यादी सर्वच भाषांमध्ये ‘बंडी' हा शब्द ‘मालवाहतुकीचे साधन' याच अर्थाने रूढ आहे. यावरून ‘बंडी' या शब्दाचे प्राचीनत्व
कळून येऊ शकते. शेतातून तनीस किवा गवत घरी आणणे, कापलेल्या धानाचे भारे खळ्यावर आणणे, चुरलेल्या धानाची रास खळ्यावरून घरी आणणे, तोडलेल्या झाडाची लाकडे आणणे, घर
बांधण्याकरिता विटा, रेती वगैरे साहित्य आणणे अशा अवजड वस्तूंना वाहून नेण्याकरिता बंडी वापरली जाते. बाजारात विक्रीकरिता धान्य किवा इतर उत्पादने घेऊन जाण्यासाठीदेखील बंडी
उपयुक्त ठरते.
 
बंडीला दोन चाके असतात. तिच्या झाडीपट्टीमध्ये माल वाहून प्रत्येक चाकास '''’भोवरी'''' हा शब्द आहे, तर या भोवरीवर जी लोखंडी धाव असते तिच्याकरिता झाडीबोलीत '''‘येट'''' हा पर्याय वापरला जातो. ती ज्या दोन लांब लाकडांवर आधारलेली असते त्यांच्यापैकी प्रत्येक लाकडास '''‘धुरा'''' म्हणतात. तिचे जे जू असते त्याचा नामविस्तार करून त्यास '''‘जुवाडा'''' हा शब्द झाडीबोलीने प्रचारात आणला आहे. हा जुवाडा खाली ठेवणे अनेकदा शक्य नसते. त्याकरिता जो तिपाया वापरण्यात येतो त्यास '''‘ढिरा'''' हा शब्द प्रचलित आहे. बंडीच्या बैलांना हाकण्याकरिता जो जाड आसूड किवा चाबूक वापरला जातो त्याला '''‘सटका'''' असे नाव आहे. पूर्वी महाशिवरात्रीला महोदवास जाणारा जो पोवा असायचा त्यातही अशा अनेक बंड्यांचा समावेश असे. म्हणूनच लोकनाट्यात गायल्या जाणाऱ्या ‘पोवाडा' या शब्दाची व्युत्पत्ती झाडीबोलीतल्या पोवा या शब्दावरून असावी.
 
प्रवासाकरिता झाडीपट्टीत जे वाहन वापरले जाते त्यास '''‘खाचर'''' किवा '''‘खासर'''' असे नाव आहे. तिचे स्वरूप बंडीसारखेच असले, तरी तिचा आकार मात्र बंडीपेक्षा लहान असतो. शिवाय निर्मितीच्या दृष्टीने बंडी ही ओबडधोबड असते, तर खासर ही त्यामानाने व्यवस्थित असते. पूवी परगावी नातेवाईकांकडे जायला खासर हेच साधन उपलब्ध होते. तेव्हा विवाहाकरिता खासरानेच जावे लागायचे. किबहुना लग्नाला अथवा वरातीला किती खासरा येणार आहेत त्यावरून त्या सोयऱ्याचा दर्जा ठरविण्याची विचित्र पद्धती त्या काळी रूढ होती. खासरेच्या पुढल्या भागात धुऱ्यावर एक टोपली ठेवलेली असे. या टोपलीत किरकोळ साहित्यासह खाजाचा '''झोलना''' असे. लहान मुलांना पाहुण्यांकडून मिळणारा स्वादिष्ट उपहार म्हणून या झोलन्याकडे मुलांचे अधिक लक्ष असायचे. खासरेच्या बैलांना हाकण्याकरिता जी पराणी वापरली जाते तिला झाडीबोलीत '''‘तुतारी'''' हा शब्द आहे. बैलांना टोचण्याकरिता त्या तुतारीला जे लोखंडी खिळ्याचे टोक असते त्यास '''‘आरू'''' असे संबोधले जाते.
 
नेहमीची खासर ही ‘'''बोडकी खासर'''' होय. पुरुष मंडळी अशा खासराने प्रवास करणे योग्य समजत असत. विशेषत: जंगलात शिकारीकरिता जायचे म्हटले की, सभोवतालचे निरीक्षण करणे हे आलेच. म्हणून या कामी बोडकी खासर अतिशय उपयुक्त समजली जायची. कांबीपासून '''करंडी''' म्हणजे बुरुड या स्थानिक बलुतेदार कारागिराने तयार केलेले आवरण होय. बांबूला झाडीपट्टीत '''येरू''', '''बास''' व '''करक''' हे अन्य तीन पर्याय वापरले जातात आणि बांबूचे जे रान असते त्यास '''‘रांजी'''' हा खास झाडी शब्द वापरला जातो. आवरण असलेली '''‘चापेची खासर'''' ही खास महिलांची मक्तेदारी असते. शिवाय या बासाच्या चापेवरही रंगीत कापडाचे आवरण असलेली नवरीसारखी सजलेली '''‘पडद्याची खासर'''' खास नववधूकरिता वापरली जाते. कुटुंबाने जायचे असल्यासदेखील चापेची खासर पूर्वी वापरायचे. लग्नास जाण्याकरिता महिलांना अशाच खाचरांची गरज असे. खाचर बोडकी असो की चापेची, खाचरेत बसून पाच-सहा व्यक्ती सहज प्रवास करू शकतात.
 
पण, '''पटा'''करिता एवढे मोठे साधन वापरणे येथील जाणकारांना अजिबात पसंत नाही. त्याकरिता त्यांनी केवळ एक अथवा जास्तीत जास्त दोन माणसे वाहून नेणारे नवीन साधन सिद्ध केले. त्यास झाडीबोलीत '''‘सेकडा'''' किवा '''‘छकडा'''' हे नाव आहे. स्थानिक '''वाढई''' म्हणजे सुतार याच्या कारागिरीचा विशेष नमुना म्हणून हा सेकडा पाहण्यासारखा असतो. बंडी, खासर व सेकडा यांचा आकार व उपयोग याचा विचार करता ट्रक, कार व फटफटी या आज उपलब्ध असलेल्या यांत्रिक वाहनांची झाडीपट्टीतील परंपरागत वाहनांशी तुलना करावयाची झाल्यास येथील बंडी म्हणजे मालवाहू ट्रक असून, खासर ही चारचाकी कारसारखी उपयोगात आणली जाते, तर सेकडा म्हणजे केवळ एकट्यादुकट्याने प्रवास करण्यास योग्य अशी फटफटी म्हणता येईल.
 
==लोकसाहित्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/झाडीबोली" पासून हुडकले