"अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अमेरिकेत बॉब आणि डॉ.बिल दोघे दारुडे भेटले. आपापले अनुभव सांगतान...
(काही फरक नाही)

१३:३७, १० जुलै २०१२ ची आवृत्ती


अमेरिकेत बॉब आणि डॉ.बिल दोघे दारुडे भेटले. आपापले अनुभव सांगताना ती संध्याकाळ कधी उलटून गेली ते समजलेच नाही..खूप वर्षांनंतर आलेली ती दारू न पिता गेलेली पहिलीच संध्याकाळ होती. दोघांनी दुसऱ्या दिवशी जमायचे ठरविले. आणखी एक संध्याकाळ तशीच गेली. आणि मग अशा संध्याकाळी रोज जाऊ लागल्या. त्यांना आणखीही काही दारुडे भेटले. त्यांच्यात सामील झाले आणि अल्होहोलिक ॲनॉनिमसची स्थापना झाली.

अल्कोहोलिक ॲनॉनिमसची काही घोषवाक्ये - वन डे ऍट अ टाइम (फक्त आजचा दिवस). धिस टू शॅल पास(हेही दिवस जातील). HALT(Hungar, Anger, Loneliness, Tiredness)

’फक्त आजचा दिवस’ या विधानाने अनेक व्यसनी लोकांची आयुष्ये बदलून गेली. काल होऊन गेलेला, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही.आपल्या हातात आहे, फक्त आज. फक्त आजचा दिवस. त्यातही आत्ताचा क्षण. भूतकाळ आठवला तर केलेल्या कृत्यांचा पश्चात्तापहोतो. गमावलेल्या संधी, गमावलेले आयुष्य़ आठवले की मनस्ताप होतो.आणि याचे पर्यवसान परत व्यसनाकडे वळणे हेच. त्यामुळे भूतकाळाचे ओझे उतरवले की दारुड्याच्या डोक्यावरचे निम्मे ओझे उतरते. आता दारू सोडली तर दारूशिवाय आयुष्य कसे कंठायचे याचे भय मनाचा ताबा घेते. शिवाय व्यसनाच्या काळात केलेल्या कर्जाची चिंता. बायको सोडून गेली असेल तर परत येईल का ही काळजी. अशा अनेक काळज्या जिवाला पोखरत असतात. परत याचा शेवट म्हणजे पिण्याकडे वळणे. तेव्हा भविष्यकाळाची काळजी करायची नाही असे ठरवायचे. कारण भविष्यकाळ आपल्या हातात नाही. म्हणजे आहे तो फक्त आजचा दिवस. आज सकाळी उठल्यावर ठरवायचे की आज मी दारू पिणार नाही.रात्री झोपताना म्हणायचे की चल, एक दिवस पदरात पडला. हवे तर त्यासाठी देवाचे आभार माना. आपल्याला मदत करणाऱ्या सर्वांचे वाटल्यास आभार माना. असे जे करतात त्याची वर्षे कशी पुरी होतात ते त्यांनाच कळत नाही.

धिस टू शॅल पास : हे घोषवाक्य म्हणजे - तू कितीही दु:खात असशील तरी हेही दिवस जातील. फिर सुबह होगी. रातका महेमाँ है अन्धेरा, किसके रोके रुका है सवेरा.

HALT : एच म्हणजे हंगर-भूक.एम म्हणजे अँगर-राग. एल म्हणजे लोन्लीनेस-एकटेपणा आणि टी म्हणजे टायर्डनेस-थकवा. या चारही गोष्टी परत व्यसनाकडे नेऊ शकतात. त्यामुळे त्या टाळायच्या. आवरी रागाला, कधी राही न भुका, दमू नको जास्त, कधी राही न अकेला. भूक, राग, एकटेपणा आणि थकवा हे चारही दारूकडे नेणारे धोक्याचे सिग्नल आहेत.

अल्कोहोलिक ॲनॉनिमसने केलेल्या आणखी काही सूचना
  • खिशात जास्त पैसे ठेऊ नका.
  • बाल्कनीत उभे राहिले आणि ढग दाटून पावसाची लक्षणे दिसायला लागली की, पूर्वी अशाच हवेत प्यालेल्या दारूची आठवण येईल. तेव्हा असे काही विचार मनात यायच्या आत बाल्कनीतून घरात या.

पूर्वी जात होतां त्या दारूच्या गुत्त्यावरून किंवा रेस्टॉरंटवरून त्या विशिष्ट वेळी जाऊसुद्धा नका. केव्हा परत दारूचे व्यसन सुरू होईल, सांगता येणार नाही.

  • आपल्या दारुड्या मित्रांना फोन करू नका, त्यांचे फोन घेऊ नका आणि त्यांना भेटूही नका. त्यांची दारू प्यायची जी वेळ असेल तेव्हा आपल्या दारू सोडलेल्या मित्रांबरोबर संस्थेतच थांबा. वगैरे वगैरे.

अल्कोहोलिक ॲनॉनिमससारख्या आणखीही काही संस्था आहेत -

  • नॉरकॉटिक ॲनॉनिमस
  • ओबेसिटी ॲनॉनिमस
  • गँबलिंग ॲनॉनिमस

भारतातही व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अल्कोहिलिक ॲनॉनिमससारख्या अनेक संस्था आहेत. त्या संस्थांतली अग्रणी संस्था म्हणजे कै.डॉ.सुनंदा अवचट, डॉ. अनिल अवचट, आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी स्थापन केलेली मुक्तांगण नावाची संस्था. ही संस्था अनेक वर्षे पु.ल. देशपांडे यांच्या पैशाने चालली.