"रवींद्र दिनकर बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
''डॉ.'' '''रवींद्र दिनकर बापट''', अर्थात '''रवी बापट''' (२ जून, इ.स. १९४२ - हयात) हे एक [[मराठा|मराठी]] डॉक्टर आणि लेखक आहेत. ते मुंबईच्या [[जी.एस.मेडिकल कॉलेज|जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये]] चार दशके प्राध्यापक आहेत (इ.स. २०१२पर्यंत) आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.
 
रवी बापटांचे वडील बालाघाटला सिव्हिल सर्जन होते. भाषावार प्रांतरचनेनंतर ते चांद्याला आले आणि सहा वर्षे राहिले. जेव्हा त्यांची मुंबईला बदली झाली तेव्हा वर्तमानपत्रात ’चांद्याचा देव चालला’ अशा मथळ्याचा अग्रलेख छापून आला होता. मुंबईत ते कामगार विमा योजनेचे प्रमुख होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ४०० विमा डॉक्टरांना गैरवर्तणुकीसाठी काढून टाकले आणि दोघांवर फौजदारी खटला भरला. पैकी एक वशिल्याने सुटला आणि दुसरा तुरुंगात गेला.
 
==शिक्षण==
साहजिकच, रवी बापट यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणच्या सात शाळांत झाले. पाथ्रीकर गुरुजींनी त्यांचा पहिली-दुसरीचा अभ्यास मध्य प्रांतातील [[बालाघाट]] येथे घरीच करवून घेतला. नंतर तिसरीमध्ये ते पुण्यातील बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत होते. ५वीत भावे स्कूल, ६वीत [[अमरावती]]ला, ७वीत [[वाशीम]]ला बक्षी सरांच्या शाळेत, आणि ८वीत हिंदी माध्यमात ते [[छिंदवाडा]] येथील शाळेत शिकले. आठवी सरतासरता ते [[जगदलपूर]]ला आले. शेवटी दहावी-अकरावीसाठी ते परत बालाघाटला आले. म्हणजे ८वी ते ११वीचे त्यांचे शिक्षण मध्य प्रांतात हिंदी माध्यमातून झाले. बालाघाटला असताना त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली व ते जिल्ह्यामध्ये पहिले आले. अकरावीनंतर मात्र रवी बापट मुंबईत मावशीकडे रहायला आले.
 
शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरित खेळांमध्ये रस होता. माटुंग्याच्या [[रुईया कॉलेज]]मधील पहिले वर्ष, रवी बापट यांनी एरफोर्समध्येएअरफोर्समध्ये प्रवेश मिळवण्यात खर्ची घातले. भाषांच्या परीक्षांत सूट मिळावी म्हणून ते [[एन.सी.सी.]](नॅशनल कॅडेट कोअर)मध्ये दाखल झाले. रुईयातर्फे ते हॉकी खेळले. त्यांना इंटरला(कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला) परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाले आणि त्यांनी [[इ.स. १९५९]]मध्ये [[जी.एस.मेडिकल कॉलेज|जी.एस.मेडिकल कॉलेजला]] विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.
 
डॉक्टरीचा अभ्यास चालू असताना रवी बापट यांचे मैदानावर खेळणे चालूच राहिले. एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी ते कॉलेजतर्फे [[हॉकी]], [[बॅडमिंटन]], [[टेनिस]], [[टेबलटेनिस]], [[फुटबॉल]], [[क्रिकेट]], [[कबड्डी]], [[व्हॉलिबॉल]] हे खेळ तर खेळलेच, शिवाय त्यांचे त्यांदरम्यान ॲथलेटिक्सही चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांतून कामेही केली.