"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Best share certificate.jpg|thumb|right|250px|"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या [[मुंबई]]तील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र]]
जनतेच्या (मर्यादित)भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) [[कंपनी]]च्या एकूण [[भांडवल|भांडवलाची]] रक्कम अनेक एककांमध्ये विभागलेली असते.अशा एककांना '''समभाग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Shares'' / ''Stocks'' , ''शेअर्स'' / ''स्टॉक'') किंवा '''शेअर''' असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची ''दर्शनी किंमत''<ref group = "श">दर्शनी किंमत (इंग्लिश: ''Face value'', ''फेस व्हॅल्यू'')</ref> म्हणतात. समभागाच्या मालकाला [[भागधारक]] <ref group = "श">भागधारक (इंग्लिश: ''ShareHolder'', ''शेअरहोल्डर'')</ref> म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी [[कंपनी]]च्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, १रु, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.
 
समभागांचे दोन मुख्य प्रकार आहेत. साधारण समभाग(Ordinary shares) आणि अधिमान्य समभाग(Preferential shares). सामान्य जनतेला अधिमान्य समभाग उपलब्ध नसतात.
 
हे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या विशिष्ट शेअरच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एका दिवसाच्या अवधीत समभागाच्या किमतीत अनेक चढ‍उतार होतात.
 
[[पुनर्गुंतवणूक]] न करण्यात आलेला [[नफा|नफ्याचा मोठा हिस्सा]] हा [[लाभांश]] <ref group = "श">लाभांश (इंग्लिश: ''Dividend'', ''डिव्हिडंड'')</ref> म्हणून [[गुंतवणूकदार|भागधारकांना]] दिला जातो. प्रतिशेअर किती लाभांश देऊ केला आहे हे शेअर होल्डरला कंपनीच्या वार्षिक अहवालावरून समजते. कंपनीला पुरेसा नफा झाला नाही तरी अधिमान्य समभागधारकांना लाभांश देणे कंपनीचे कर्तव्य असते. त्या वेळी साधारण भागधारकांना लाभांश मिळत नाही
 
[[वित्तीय बाजार|वित्तीय बाजारांमधील]] समभाग म्हणजे साधारण समभाग किंवा [[अधिमान्य समभाग|अधिमान्य समभागांसारख्या]]<ref group = "श">अधिमान्य समभाग (इंग्लिश: ''Preferential stock'', ''प्रेफरेन्शियल स्टॉक'')</ref> विविध [[वित्तीय साधन|वित्तीय साधनांसाठी]]<ref group = "श">वित्तीय साधन (इंग्लिश: ''Financial instrument'', ''फायनॅन्शियल इन्स्ट्रुमेंट'')</ref>, तसेच [[मर्यादित भागीदारी]]<ref group = "श">मर्यादित भागीदारी (इंग्लिश: ''Limited partnerships'', ''लिमिटेड पार्टनरशिप्स'')</ref> व [[स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ|स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील]]<ref group = "श">स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ (इंग्लिश: ''Real estate investment trusts'', ''रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स'')</ref> गुंतवणुकीसाठी ''[[हिशेबाचे एकक]]''<ref group = "श">हिशेबाचे एकक (इंग्लिश: ''Unit of account'', ''युनिट ऑफ अकाउंट'')</ref> असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/समभाग" पासून हुडकले