"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ.''' हे प्र.के. घाणेकर यांनी ल...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जावे असे अनेकांना वाटत असते. पण तिथे कसे जावे? काय पाहावे? अडचणी काय येतात? ह्या पुष्पदरीचा शोध कुणी लावला? तिथं आढळणाऱ्या फुलांची नावे काय आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वनस्पती अभ्यासक व पर्यटनप्रेमी प्र. के. घाणेकरांच्या या पुस्तकात मिळतील.
 
==आख्यायिका==
 
लक्ष्मणप्रयागला स्नानासाठी आलेल्या द्रौपदीला एकदा पाण्याच्या प्रवाहातून वाहत जाणारे एक सुवर्णरंगी फूल मिळाले. या सुरंगी ब्रह्मकमळाची आणखी फुले मिळवून देवांची पूजा करावी, असे तिला वाटले. तिने शोध घेतला. मात्र असे देखणे फूल तिला त्या परिसरात आढळले नाही. अखेर तिने ते ब्रह्मकमळ भीमाला दाखवले, आणि आपल्या मनातील इच्छा त्याला बोलून दाखवली. त्याने तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले, आणि ब्रह्मकमळाच्या शोधात तो फिरू लागला. फिरता फिरता तो पुष्पगंगेच्या किनाऱ्याने एका दरीमध्ये शिरला. देवलोकीच्या त्या पुष्पसमुद्रात त्याला ब्रह्मकमळांचा ताटवाही आढळला. देवलोकीचे हे अद्भुत स्वर्गोद्यान म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्स.