"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Best share certificate.jpg|thumb|right|250px|"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या [[मुंबई]]तील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र]]
जनतेच्या (मर्यादित)भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) [[कंपनी]]च्या एकूण [[भांडवल|भांडवलाची]] रक्कम अनेक एककांमध्ये विभागलेली असते.अशा एककांना '''समभाग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Shares'' / ''Stocks'' , ''शेअर्स'' / ''स्टॉक'') किंवा '''शेअर''' असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची ''दर्शनी किंमत''<ref group = "श">दर्शनी किंमत (इंग्लिश: ''Face value'', ''फेस व्हॅल्यू'')</ref> म्हणतात. समभागाच्या मालकाला [[भागधारक]] <ref group = "श">भागधारक (इंग्लिश: ''ShareHolder'', ''शेअरहोल्डर'')</ref> म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी [[कंपनी]]च्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.
 
हे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या विशिष्ट शेअरच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एका दिवसाच्या अवधीत समभागाच्या किमतीत अनेक चढ‍उतार होतात.
 
[[पुनर्गुंतवणूक]] न करण्यात आलेला [[नफा]] हा [[लाभांश]] <ref group = "श">लाभांश (इंग्लिश: ''Dividend'', ''डिव्हिडंड'')</ref> म्हणून [[गुंतवणूकदार|भागधारकांना]] दिला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/समभाग" पासून हुडकले