"केशव रामराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{वर्ग}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
डॉ.के.रा.जोशी हे नागपूर विद्यापीठातून एम.ए.पीएच.डी. झाले. त्यानंतर साहित्याचार्य (जयपूर), काव्यतीर्थ (कोलकाता), साहित्योत्तमा (बडोदा), संपूर्ण दर्शन मध्यमा (वाराणसी) या पदव्याही त्यांनी संपादन केल्या.
 
त्यांचा प्राचीन , अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता. गरिबीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले होते. त्यांनी काशीला राहून शास्त्री पंडितांसमवेत परंपरागत अध्ययन केल्यानंतर तत्त्वज्ञान, व्याकरण आणि वेदाभ्यास यांत न अडकता शास्त्राभ्यास आणि ललित लेखनावरही आपले प्रभुत्व सिद्ध केले. त्यांनी हुंड्यासारख्या सामाजिक समस्यांचा ऊहापोहदेखील त्यांच्या संस्कृत साहित्यातून केला.
 
के.रा.जोशी नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष होते. बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते. तसेच ते नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष होते. के.रा.जोशी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा अनुदानित हिंदी भाषिक राज्यांमध्ये संस्कृत शिक्षणाच्या समस्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात संस्कृत साहित्य या विषयावर अखिल भारतीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यांचा प्राचीन आणि अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता.