विदा

संगणकीय माहितीचे एकक

संगणकावर साठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला विदा (इंग्रजी: Data - डेटा किंवा डाटा) म्हणतात. माहितीसाठ्याला विदागार (इंग्लिश : database - डेटाबेस) असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे; विद् या संस्कृत धातूवरून विदा हा शब्द आला आहे. जसे विद्‌पासून विद्या.

विदा अनेक घटकांची बनलेली असू शकते. जसे प्रयोग, निरीक्षणे, आकडेवारी, चित्र, शब्द, शब्दांचा क्रम, टचपॅडवर केलेल्या हालचाली, किती जोर देऊन बटणं दाबली, कुठल्या वेळेस विकिपिडियाच्या कुठल्या पानात किती बदल केला, इत्यादी.

विदागार संपादन

एका विशिष्ठ पद्धतीने, सुयोग्य रचनेने साठवून ठेवलेल्या विदेस विदागार (डेटाबेस) म्हणतात. साधारणतः विदागारात तक्त्यांचा वापर होतो. त्यांना इंग्लिशमध्ये रिलेशनल डेटाबेस म्हणतात; उदाहरणार्थ, पोस्टग्रेस. दुसऱ्या प्रकारच्या विदागारांना नो-एस.क्यू.एल. म्हणतात, उदाहरणार्थ, माँगो (Mongo). विदागारात विदेची भर घालणे, त्यात बदल करणे, अथवा विदा काढणे यांसाठी विविध विदागार व्यवस्था व भाषा असतात. उदाहरणार्थ, एस.क्यू.एल भाषेतील विविध बोली.

शास्त्र व संगणकातील विदा संपादन

सर्वसाधारणपणे विदा म्हणजे माहितीचे एकक. असंकलित विदेचे तुकडे खंड मानवी प्रक्रियेद्वारे अथवा संगणकाद्वारे एकत्रित करून त्यातून दुसऱ्या संगणक अथवा मानवाला समजेल अशा माहितीच्या निष्कर्षात रूपांतर करणे म्हणजेच विदेवर प्रक्रिया करणे.

साठवण संपादन

संगणकात माहिती साठविण्याची अनेक माध्यमे असतात जसे हार्ड डिस्क, फ्लॉपी, सी.डी., डी.व्ही.डी., यू.एस.बी., चुंबकीय फित इत्यादी.