मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही, केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.सर्वांकडून ज्ञान घेणे आणि देणे यात सर्वांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने तो मुक्ततेचा आवाका लक्षात घेतानाच, विकिपीडियाच्या परिघास मर्यादा आहेत.