सारडे हे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे. येथून जवळच असलेले भंगारपाडा हा याच ग्रामपंचायतीचा एक भाग आहे. गावच्या एकूण लोकसंख्येपैकी २.३% लोक कातकरी आहेत.

गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत. वरती राधाकृष्णाचे मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मृर्ती आहे. श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्‍या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण असते. भंगारपाड्यात कराडी समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस श्री बहिरी देवाचे मंदिर आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या खाडीस जाऊन मिळते. गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला कडापे ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे तांदळांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला घोल म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक बाया म्हणतात .

गोपाळकाला हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.

त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्‍या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात. (पुढे वाचा...)