वालोनी (वालून: Walonreye, फ्रेंच: Wallonie, जर्मन: Wallonie, डच: Nl-Wallonië.ogg Wallonië ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिण भागातील हा प्रदेश मुख्यतः फ्रेंच भाषिक आहे. बेल्जियमच्या एकूण क्षेत्रफळाचा ५५ टक्के भाग वालोनी प्रदेशाने व्यापला आहे व एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के जनता येथे वसलेली आहे.

वालोनी प्रदेश
Région wallonne (फ्रेंच)
Waals Gewest (डच)
Wallonische Region (जर्मन)
बेल्जियमचा प्रांत
ध्वज
चिन्ह

वालोनी प्रदेशचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
वालोनी प्रदेशचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राजधानी नामुर
क्षेत्रफळ १६,८४४ चौ. किमी (६,५०४ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,५६,७७५
घनता २०५.२ /चौ. किमी (५३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-WAL
संकेतस्थळ www.wallonie.be

नामुर हे वालोनीचे प्रशासकीय मुख्यालय असून चार्लेरॉय, लीज, माँस ही येथील मोठी शहरे आहेत. उत्तरेकडील डच भाषिक फ्लांडर्स प्रदेशाच्या तुलनेत वालोनीची अर्थव्यवस्था बरीच कमकुवत आहे. वाढती बेरोजगारी व ढासळते दरडोई उत्पन्न ह्यांमुळे येथील व फ्लांडर्समधील जनतेमधील दरी वाढत चालली आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत