वळू किंवा सांड हा गायीचा नर आहे. हा प्राणी अंगाने तगडा असतो. प्रजोत्पादनास या प्राण्याचा उपयोग होतो. महाराष्ट्रातील काही जातिवंत खिल्लार वळूंच्या नावावर जास्तीत जास्त १७/१८ गाई एका दिवसाला नेसर्गीक रेतन करण्याचे रेकॉर्ड देखील आहे. काही वळूनी त्यांच्या १५ वर्षाच्या आयुष्यात जवळपास ११,००० पेक्षा जास्त गाई देखील नेसर्गीक रेतन केलेल्या आहेत. सध्या खिल्लार गोवंशामध्ये पंढरपूर जवळील सिद्धापूर गावातील खिल्लार खान सर्वात जास्त प्रसिद्ध आणि जुनी मानली जाते. या सिद्धापूर खाणीतील सर्वात जास्त पैदास आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाहायला मिळते.

खिल्लार वळूची विशेष लक्षणे संपादन

वळूची पिळदार शरीरयष्टी, दमदार छाती, भारदस्त ऊँची ,अंगावर असलेले ठिपके, पांढरे शुभ्र वस्त्र यामुळे वळूचा रुबाब जरा जास्त देखणाच दिसतो, तसेच त्याची उच्च वंशावळ या वैशिष्टांमुळे.

उत्तम पैदाशीसाठीचे नियम संपादन

उत्तम पैदाशीसाठी खिल्लार पालकाने सर्वप्रथम आपली गाय खिल्लारच्या कोणत्या उपजाती मध्ये मोड़ते, हे जाणून घेतल पाहिजे व त्यानुसार त्या उपजातीच्या वळूची निवड केली पाहिजे. उदा: काजळी गाईच्या मालकाने शक्यतो कोसा /हरन्या / गाजरी वळू कड़ून आपली गाय रेतन करने टाळावे.

खिल्लार वळू निवडताना त्यात पुढील निकष पाळावेत

  1. फ़ाउंडेशन (पाया): तळ/खुर बैलाचे पाय सरळ आणि एका रेषेत असावे वाकड़े नसावेत. खुर काळे दगडा सारखे घट्ट मज़बूत असावेत. दोन पायांमध्ये योग्य अंतर असावे.
  2. शरीर: शरीर बांधा पीळदार, चपळ, तसेच पाठीचा कणा एक समान असावा, चढ़ उतार असलेला नसावा
  3. वशिंड: गोलाकार महादेवाचा पिंडी सारखे असावे, जास्त मोठे नसावे मध्यम आकाराचे असावे व एक बाजुला झुकलेले नसावे.
  4. चेहरा: निमुळता लांब व कपाळ अरुंद असावे. डोळे पाणेदार, भावपूर्ण आकर्षक असावे. कान लहान असावे, लांब नसावे, कमीत कमी चेहरापासुन ४५ अंशात असावे त्यामुळे एकंदरीत चेहरा आकर्षक वाटतो
  5. शिंग: शिंगाची लांबी शरीराला शोभेल अशी असावी. शिंगाचा रंग काळसर असावा, जाडी कमी असावी
  6. बेंबी: आटोपशीर पोटाला चिकटून असावी, मूत्रविसर्जनाचीं जागा लोंबती नसावी
  7. छाती: भारदस्त रुंद असावी, पुढील दोन पायांमधील भाग जास्त फूगिर नसावा
  8. गळकांबळ (पोळी): शक्य तितकी पातळ असावी, तसेच छाती आणि कंठा जवळ पोळी एकदम कमी असावी.
  9. शेपुट: शेपुट ही जाड़ीला उगमापासुन गोंड्या पर्यंत बारीक निमुळती असावी. लांबी गुडघ्या पर्यंतच असावी, शेपुट गोंडा गुडघ्यापासुन खाली रहावा, झूपकेदार असावा.
  10. चौकः चौक म्हणजे बैलाचा/गाईचा पाठिवरचा मागचा बाजूचा भाग जो रुंद पसरट असावा. शेपटाचा बाजुला जास्त उतार नसावा.

वळूचे निकष संपादन

नाव आणि माहिती अवयव
फ़ाउंडेशन (पाया)
शरीर शरीर
वशिंड
चेहरा1 चेहरा2 चेहरा3
शिंग1 शिंग2
बेंबी
छाती
गळकांबळ (पोळी)
शेपुट
चौक चौक

आज्ञाधारक वळू कसा करावा संपादन

खिल्लार वळूला आज्ञाधारक करण्यासाठी दिवसातील जास्तीत जास्त वेळ म्हणजे ८ तास तरी त्या वळू सोबत घालवावा. वैरण, पाणी हे त्या एकाच व्यक्तीने करावे, त्याला हाक मारणे, त्याला गोंजारने कि जेणेकरून त्याला तुमची सवय झाली पाहिजे.

प्रसिद्ध वंशावळ खिल्लार क्षेत्राची संपादन

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोडमुर्ग सोन्या(शिंगमोडकं), श्रीशैल दळवाई, तिकोंडी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गुरूबसू तेली, गाव: संख, ता जत, जि सांगली,तासगाव चॅम्पियन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मूळ उगमस्थान - गाव: कर्जाल, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुदक्काप्पा तेली, (सिद्धापूर) - दत्तात्रय काशीद, जवळा