वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी (मुंबई)

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे मुंबईच्या वरळी भागातील एक मैदान आहे. इ.स. १९५७ साली बांधलेल्या या स्टेडियममध्ये ५,००० प्रेक्षक बसू शकतात. हे स्टेडियम २००५ साली वातानुकूलित झाल्याने इनडोअर झाले.

वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी

नॅशमल स्पोर्ट्‌स क्लब ऑफ इंडिया ही संस्था या स्टेडियमची देखभाल करते. या मैदानात टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्ड्‌ज, कॅरम आणि कुस्त्यांचे सामने होतात. इंडियन बॅडमिंटन लीग, मुंबई मराठा या संघांचे आणि यू-मुंबा कबड्डी संघाचे हे घर-मैदान आहे.

दारासिंग, किंगकाँग, रंधावा, गामा-गुंगा आणि अनेक देशी परदेशी मल्लांच्या कुस्त्या या मैदानावर झाल्या आहेत..