लुईस पॅट्रिशिया ब्राउन (१६ मार्च, १९५२:त्रिनिदाद - हयात) ही त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ९ महिला कसोटी, २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. लुसी ने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. नंतर वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इसवी सन १९७६ मध्ये पहिली वहिली महिला कसोटी खेळली. त्यात लुसीलाच वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार बनविल्यात आले.