रामठाकूर (बांग्ला: শ্রীশ্রী রামঠাকুর) (२ फेब्रुवारी १८६० - १ मे १९४९) हे १९व्या शतकातील भारतामधील बंगाली आध्यात्मिक गुरु होते.[१] त्यांचे जन्म नाव राम चंद्र चक्रवर्ती (बांग्ला: রাম চন্দ্র চক্রবর্তী ) असे होते. त्यांना श्रीनारायणाचे आध्यात्मिक रूप मानले जाते. भगवान कैवल्यनाथ आणि भगवान श्री श्री सत्यनारायण या दोन रूपात त्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा करताना "जय राम", "जय श्री राम" तसेच "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे" हे महामंत्र जपले जातात. अविभाजित भारतातील लाखो भक्तांना ते नाम किंवा मंत्र दीक्षा देत असत. त्यांनी देह सोडल्यानंतर "महानाम" ची परंपरा महंत महाराज देत आहेत.

ते परम ब्रह्माचे पूर्णब्रह्म अवतार होते.

संदर्भ संपादन

  1. ^ "Sri Sri Kaibalyadham – Ramthakur | Kaibalyanath | Satyanarayon". srisrikaibalyadham.org.

बाह्य दुवे संपादन

  •   विकिमिडिया कॉमन्सवर Ram Thakur शी संबंधित संचिका आहेत.