राकेश टिकैत (४ जून ,१९६९:सिसौली, उत्तर प्रदेश, भारत - ) हे एक भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) एक भारतीय राजकारणी आहेत.[१]

पूर्वजीवन संपादन

टिकैत यांचा जन्म ४ जून १९६९ रोजी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली शहरात झाला. ते उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते आणि बीकेयूचे सह-संस्थापक महेंद्रसिंग टिकैत यांचे पुत्र आहेत. बीकेयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत हे राकेश टिकैत यांचे सगळ्यात मोठे भाऊ आहेत.[२]

कारकीर्द संपादन

१९९२ मध्ये ते दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल तत्कालीन सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले, परंतु १९९३-१९९४  मध्ये त्यांनी दिल्ली पोलीस सोडले. २०१८ मध्ये, टिकैत उत्तराखंड ते हरिद्वार ते दिल्ली पर्यंत किसान क्रांती यात्रेचे नेते होते. टिकैत यांनी २००७ मधील यूपी विधानसभा निवडणुकीत खतौली मतदारसंघातून बहुजन किसान दल (बीकेडी) पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते अमरोहा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोक दलाच्या तिकिटावर लढले होते. तसेच, त्यांनी आणि त्यांच्या संघटनेने गेल्या निवडणुकीत महागडबांधनाला पाठिंबा दर्शविला होता.

संदर्भ संपादन

  1. ^ Jul 2021, ANI | 10; Ist, 05:34 Pm. "Delhi: From July 22 onwards, 200 people will hold protests near Parliament, says Rakesh Tikait". The Economic Times. 2021-07-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Will farmer leaders contest upcoming assembly polls? A hint from Rakesh Tikait". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-07-12. 2021-07-13 रोजी पाहिले.