डाॅ. रमेश नारायण वरखेडे हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे अनुष्टुभ् ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.[१] यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे ह्या विभागाचे ते संचालक होते. ह्याच विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री ह्या नियतकालिकाचे ते ९ वर्षे संपादक होते.[२]

रमेश वरखेडे
डॉ. रमेश वरखेडे
जन्म नाव रमेश नारायण वरखेडे
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती सायबरसंस्कृती

लेखन संपादन

  • जगप्रसिद्ध गोष्टी (बालसाहित्य)
  • मनोरंजक गोष्टी (बालसाहित्य)
  • मराठी लोकगीते : संस्कृतीची साधने (२०११), साहित्य अकादेमी, दिल्ली
  • लोकसाहित्य : संशोधनपद्धती (२००२), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • समाजभाषाविज्ञान : प्रमुख संकल्पना (२००१), शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
  • संशोधनपद्धती (२०१३) [३], इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
  • सायबर-संस्कृती : इंटरनेट क्रांतीनंतरच्या सांस्कृतिक बदलांचा मागोवा (२०१५) [३], इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
  • साहित्य : आस्वाद आणि समीक्षा (१९९५), चेतश्री प्रकाशन अंमळनेर
  • साहित्यविमर्श

संपादने संपादन

  • भाषांतरविद्या : स्वरूप आणि समस्या (१९९७), प्रकाशक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • भाषावार प्रांतरचना आणि मराठी : काही परिप्रेक्ष्य
  • वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश (२००१), प्रकाशक - ग. रा. भटकळ फाऊंडेशन, मुंबई
  • संज्ञापनविद्या व ललितकला (२००३), प्रकाशक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

संदर्भयादी संपादन

संदर्भसूची संपादन

  • शेवाळे, प्रकाश. "अनुष्टुभ्-चे धोरण" (PDF). [शोधगंगा : अनुष्टुभ् नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान (प्रबंध)]. ०८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन