मीनाक्षी शिरोडकर उर्फ रतन पेडणेकर या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रख्यात अभिनेत्री होत. त्यांनी प्रामुख्याने मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी आणि दूरदर्शनमध्ये काम केले. इ. स. १९३८ मधे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मास्टर विनायक समवेत ब्रह्मचारी (१९३८) या मराठी चित्रपटाच्या स्विमसूट मधील दृश्यांनी त्या खूप गाजल्या. शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर या दोन बॉलिवूड अभिनेत्रींची त्यास आजी होत्या.

मीनाक्षी शिरोडकर
Meenakshi Shirodkar wearing swimsuit in Bramhachari (1938)
जन्म ११ ऑक्टोबर १९१६ (1916-10-11)
मृत्यू ३ जून, १९९७ (वय ८०)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
नागरिकत्व भारतभारतीय
नातेवाईक नम्रता शिरोडकर, शिल्पा शिरोडकर (नाती)

११ ऑक्टोबर १९१५ रोजी गोव्यातील पेडणेकर या कोकणी कुटुंबात मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म झाला. लहान वयातच त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. १९३६ मध्ये त्यांचं डॉ.शिरोडकर यांच्याशी लग्न झाले. ४ जून १९९७ रोजी मीनाक्षी शिरोडकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी मुंबईत निधन झाले.