मिखाइल खोदोर्कोव्स्की

मिखाइल बोरिसोविच खोदोर्कोव्स्की (रशियन:Михаил Борисович Ходорковский; २६ जून, १९६३:मॉस्को, रशिया - ) हा सोवियेतरशियन उद्योगपती व अब्जाधीश आहे. याने सोवियेत संघाच्या विघटनानंतर सायबेरियामधील खनिज तेलाचे साठे सरकारकडून टाकाऊ किंमतीला विकत घेउन आपली संपत्ती गोळा केली.

२०१५मध्ये खोदोर्कोव्स्की

ऑक्टोबर २००३मध्ये याला रशियाच्या व्लादिमिर पुतिन सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली.[१] २०१०मध्ये या व इतर अनेक खटल्यांमध्ये त्याला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. २०१३मध्ये पुतिनने खोदोर्कोव्स्कीला माफी दिली व खोदोर्कोव्स्कीला रशियाबाहेर घालवले. हा आता लंडनमध्ये परागंदा आहे.[२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Seth Mydans, Erin E. Arvedlund (26 October 2003). "Police in Russia Seize Oil Tycoon". New York Times (English भाषेत). 9 March 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Gentleman, Amelia (20 March 2018). "Russian oligarch in London fatalistic about his safety from attack". The Guardian. 10 October 2018 रोजी पाहिले.