मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे १९३२ साली स्थापन करण्यात आले. देशभरात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभर सतरा संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. हे केंद्र त्यापैकी असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीच्या अंतर्गत काम करते.

कार्य संपादन

या केंद्रामध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि चांगला उतारा देणाऱ्या ऊसाच्या नवीन जाती निर्माण करणे आणि त्यांचा प्रसार करणे हे महत्त्वाचे काम केले जाते. ऊसाची लागवड पद्धत, ऊसाच्या विविध अवस्थांमध्ये पाण्याची गरज, उसातील कीड आणि कीटकांचे नियंत्रण, खते आणि तण व्यवस्थापन, सेंद्रिय खते इ. गोष्टींवर येथे संशोधन केले जाते. तसेच ऊसाला दिली जाणारी नायट्रोजन मात्रा कमी करणे, स्फुरद खते देण्याची पद्धत, जमिनीची सुपीकता ठरवण्यासाठी रासायनिक पद्धत इ. गोष्टींवर येथे संशोधन केले जाते. सुधारीत जातीच्या बेण्याची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे कामही हे केंद्र करते.केंद्राद्वारे शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिके केली जातात. पिक संरक्षण सेवा पुरवली जाते. ऊस आणि गुळाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी केंद्रातर्फे पुरस्कार सुद्धा दिले जातात.

विकसित केलेल्या ऊसाच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये संपादन

या केंद्राने ऊसाच्या १३ जाती प्रसारीत केल्या आहेत. त्यापैकी काही अशा:

  • को-८६०३२ : तिन्ही हंगामांसाठी उपयुक्त, काणी रोगास प्रतिकारक जात
  • एमएस १०००१ : लवकर परिपक्व होणारी, जास्त साखर उतारा देणारी आणि जास्त उत्पादन देणारी जात
  • कोएम 0२६५ फुले २६५ : क्षारपड आणि चोपण जमिनीसाठी उपयुक्त जात
  • को-४१९ : गुळासाठी उत्तम जात
  • को-७४० :पाण्याचा ताण सहन करणारी जात
  • को- ७२१९ : लवकर परिपक्व होणारी जात
  • कोएम ७१२५ : ऊस लोळत नाही
  • को ७५२७ : कोल्हापूर परिसरासाठी योग्य जात
  • कोएम ८८१२१ : पाण्याचा ताण सहन करणारी तसेच खोडव्यासाठी चांगली जात
  • को ८०१४: गुळासाठी उत्तम जात
  • को ८६०३५
  • को ९४०१२ : अधिक साखर उतारा देणारी जात


संदर्भ यादी संपादन

.[१]

  1. ^ आयआयएसआरचे संकेतस्थळ[१] Archived 2018-01-02 at the Wayback Machine..