मेंदूला पुरेसा प्राणवायूचा पुरवठा न मिळाल्याने मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा ॲटॅक अथवा लकवा,याला ब्रेन ॲटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चालू तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.[१]

Space Occupying Lesion with Metastatic Infiltration

छातीत धडधडण ही गोष्ट वरकरणी साधी वाटली तरीही प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.त्याच बरोबर धाप किंवा अस्वस्थता वाटत असेल तर ही कदाचित ब्रेन स्ट्रोकच्या अटॅकची लक्षणही असू शकतात.उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. [२]

ब्रेन स्ट्रोक एक घातक रोग आहे आजकल १० पैकी ६ व्यक्ती कधी न कधी स्ट्रोकच्या समस्याचे शिकार होतात बहुतेक वाढत्या युगामध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसतात ज्या कारणाने बऱ्याच वेळा मानवी व्यक्तीचा मृत्यूही होतो. ब्रेन स्ट्रोक येण्यानंतर रुग्णांना बहुतेक त्यांच्या बोलण्यातून आणि ऐकण्याची शक्ती गमावून बसतो.जीवन जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या लोकांचा सहारा घ्यावा लागतो.या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये अडचणी, शरीराचा एक भाग सुन्न पडणे, मासपेशींमध्ये कमजोरी येणे इत्यादी अनेक प्रकारची समस्या आहे. [३]

ब्रेन स्ट्रोक झाल्यावर मेंदूत गुठळ्या होतात.उत्तर गुठळ्या हृदयाकडून मेंदूपर्यंत पोहोचतात.ह्या गुठळ्या विरघळवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल इंजेक्शन घ्यावे लागतात.हृदयाचे ठोके अनियमित असतील तर आणि त्यावर वेळेत उपचार केले नाही तर त्याचा गुठळ्या तयार होतात.या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचतात.त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो.आणि हृदय बंद पडते. हि समस्या जगभरात आढळून येते.आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत चालले आहे.या संदर्भात २०१० साली लोकसंख्येवर आधारित करण्यात आलेल्या पाहणीत तीन कोटी ३५ लाख व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे आढळून आले आणि यात दरवषी सुमारे ५० लाख व्यक्तींची भर पडत आहे.हि काळजी करण्यासारखी बाब आहे.कारण यामुळे हृदयात गुठळ्या तयार होऊन त्या शरीरातील इतर अवयवपर्यंत विशेषतः मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका असतो.

ब्रेन स्ट्रोक कसा ओळखावा संपादन

  • बोलायला आणि समजायला अवघड जाते.आवाजात फरक पडतो किंवा काही गोष्टी समजण्यास अडचण येते.
  • चेहऱ्यावर, हात किंवा पाय यावर कमजोरी येते किंवा ते सुन्न होतात. विशेषतः शरीराच्या एका बाजूला भागाला जास्त जाणवते.
  • एक किंवा दोन्ही आंखांपासून ते अडखळणे आपण अचानक एका किंवा दोन्ही डोळेाने अंधुक किंवा काळे दिसू शकता किंवा एकाचे दोन दिसू शकतात.
  • अचानक डोक्यात खूप दुखणे आणि त्याच्याबरोबरच उलटी,चक्कर आणि बेशुद्ध होण्याची शक्यता आहे.
  • चालताना अडचणी येतात.

[४]

हा रोग कोणाला होऊ शकतो? संपादन

  • ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कोणालाही विशेषता: पुरुषांना होऊ शकतो.
  • आनुवंशिकता असल्यास
  • उच्च रक्तदाब असलेल्यांना
  • शरीरात कोलेस्टेरॉलच प्रमाण अधिक असलेल्यांना होतो.
  • धुम्रपान करणाऱ्यांना होतो.
  • मधुमेहाचे रुग्ण
  • माइल्ड स्ट्रोक ॲटॅक आलेले
  • नैराश्य आलेले किंवा मानसिक तणावाखाली असणारे
  • अल्कोहोलच अतिरिक्त सेवन करणारे

आहार संपादन

पोषक पदार्थांचे सेवन सगळ्यांसाठी ते आवश्यक आहेत, परंतु विशेषतः त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहेत, जे ब्रेन स्ट्रोक पासून पीडित आहेत पोषक अन्न खाणे नाही फक्त मस्तिष्क क्षतिग्रस्त होणारी कोशांची पुनर्रचना होऊ शकते,पण भविष्यात स्ट्रोक होण्याची शक्यता आहे. अस जेवण करा कि ज्यामध्ये मीठ, कोलेस्ट्रॉल,ट्रान्सफॅट आणि सेचुरेटेड फॅटची मात्रा कमी असेल.आणि एंटीऑक्सीडंट, विटामिन ई, सी आणि ए मात्रा अधिक असेल. संपूर्ण अन्नधान्य खाणे, कारण हे फायबर चांगले स्रोत आहेत आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अदरकचे सेवन करा,कारण ह्यामुळे रक्त पातळ होते आणि थाप तयार होणे आशंका कमी होतो.ओमेगा फॅटीऍसिड युक्त खाद्य पदार्थ जसे की मासे,अखरोट,सोयाबीन इ. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण कमी होतो.जांभूळ,गाजर,टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या भाज्या निश्चितपणे खाऊन घ्यावे कारण त्यात ॲंटी ऑक्सीडंटचे प्रमाण खूप जास्त आहे. [५]

लक्षण संपादन

लहान स्वरूपाच्या स्ट्रोक मध्ये मात्र अशी कोणतीही लक्षण दिसत नाहीत.मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याच काम होत असत.

  • अशक्तपणा येणे
  • डोळ्यांसमोर अंधारी येणे.
  • चालताना अडखळत चालणे
  • शरीराच संतुलन बिघडणे
  • स्मरणशक्ती वर परिणाम होणे
  • बधीरपणा येण
  • धुरकट किवा दुहेरी प्रतिमा दिसण
  • लकवा येणे
  • तोंड वाकडं होणं बोबडी बोलणे
  • एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं,
  • डोकं दुखणं
  • झटके येणं

उपाय संपादन

आपल्याला असणाऱ्या उच्च रक्तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असं आवश्यक आहे. तसचं त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असण गरजेच आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.

  • धुम्रपान टाळावे
  • कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.
  • आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोचा ॲटिआॉक्सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो.
  • ॲरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत.
  • मानसिक ताणावर नियंत्रण ठेवाव.
  • विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "ब्रेन स्ट्रोक |प्रभात वर्तमान पत्र". www.Prabhat.com. २०१८-२९-०५ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "maharashtratimes | indiatimes!". www.maharashtratimes.com (मराठी भाषेत). २०१८-०३-०६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  3. ^ "punjabkesari". nari.punjabkesari.in (हिंदी भाषेत). २०१८-०४-०६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "ब्रेन स्ट्रोक कसा ओळखावा". www.onlymyhealth.com (हिंदी भाषेत). २०१८-०४-०६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  5. ^ "punjabkesari आहार". www.livehindustan.com (हिंदी भाषेत). २०१८-०४-०६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]