ब्रायन लारा क्रिकेट अकादमी

ब्रायन लारा क्रिकेट अकादमी हे त्रिनिदाद आणि टोबॅगोतील त्रिनिदाद शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. वेस्ट इंडीजचा महान क्रिकेट खेळाडू ब्रायन लारा याचे नाव या मैदानाला देण्यात आले.

ब्रायन लारा क्रिकेट अकादमी
मैदान माहिती
स्थान त्रिनिदाद
स्थापना २००८
आसनक्षमता १५,०००

शेवटचा बदल १० जानेवारी २०२२
स्रोत: Cricinfo क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

हे मैदान मुख्यत: महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने श्रीलंका विरुद्ध या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.