बेल्शेन (उंची १४१४ मी) हे जर्मनीlतील श्वार्त्सवाल्ड पर्वतरांगेतले चौथ्या क्रमांकाचे शिखर आहे. ते बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्याच्या म्युन्स्टरटाल, श्योनेनबर्ग, व क्लाइनेस वीझनटाल या जिल्ह्यांत मोडते. बेल्शेन परिसर दक्षिण श्वार्त्सवाल्ड अभयारण्याचा भाग आहे. बेल्शेनच्या पायथ्याशी राहण्याची सोय असून तिथून शिखरावर जायला केबल कार आहे. त्याच्या उंचीमुळे बेल्शेनवरून फार दूरचे दिसते. ऱ्हाईनचे खोरे, आल्प्स पर्वतरांगा, व श्वार्त्सवाल्डचे बेल्शेनवरून होणारे दर्शन नयनरम्य आहे. ते बघण्यास दररोज पर्यटकांची गर्दी असते.