बेंटी ग्रेंज हेल्मेट

बेंटी ग्रेंज हेल्मेट ७ व्या (बीसी) शतकात बनवले होते. बेंटी ग्रेंज एक बोर-क्रिस्टेड सारखे दिसणारे एंग्लो-सॅक्सन हेल्मेट आहे. १८४८ मध्ये वेस्टर्न डर्बीशायर मधील मोनिश येथील बेंटी ग्रेंज शेतातील टुमुलसमधील खोदकामात तो सापडला. ते हेल्मेट थॉमस बेटमॅनद्वारे खोदकामात सापडले होते. ती कबर कदाचित बेटमॅनच्या उत्खननाच्या वेळी लुटण्यात आली होती. तसे असूनही काही उच्च दर्जाच्या वस्तू तेथे सापडल्या होत्या उदा एका लटकवणाऱ्या वाडगाचे खंडित अवशेष होते. तशाच ईतर समृद्ध सजावटींच्या वस्तू दफन केलेल्या असाव्यात. हे हेल्मेट सध्या शेफिल्डच्या वेस्टन पार्क संग्रहालयात प्रदर्शित केलेले आहे. त्याने १८९३ मध्ये बेटमॅनच्या मालमत्तेतून विकत घेतलेले होते.

बेंटी ग्रेंज हेल्मेट
बेंटी ग्रेंज हेल्मेटचे रंगीत छायाचित्र
बेंटी ग्रेंज हेल्मेट, आधुनिक पारदर्शी आधारावर
साहित्य लोखंड, हॉर्न
वजन १.४४१ किलो ग्रॅम
सापडले १८४८
बेंटी ग्रेंज फार्म, मोन्याश, डर्बीशायर, इंग्लंड
53°10′30″N 1°46′59″W / 53.174895°N 1.782923°W / 53.174895; -1.782923
द्वारे शोधलेले थॉमस बेटमॅन
वर्तमान स्थान वेस्टन पार्क संग्रहालय, शेफील्ड
नोंदणी क्रमांक J93.1189

हेलमेटचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे टोकावर असलेले रानडुकर. हे मूर्तिपूजक चिन्ह एका ख्रिश्चन क्रॉसच्या समोरील बाजुसारखा दिसते. हे सातव्या शतकातील इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करते. त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी हळूहळू एंग्लो-सॅक्सन लोकांना पारंपारिक जर्मनिक पौराणिक कथांपासून दूर करून धर्मांतरीत करत होते. ह्या हेल्मेटवर असलेल्या मोठ्या रानडुक्कर आणि लहान क्रॉसमुळे ते मूर्तीपूजाकाकडे जस्त कललेले वाटते. पारंपारिक प्रभावा पाडण्यासाठी क्रॉस जोडलेला असावा, यामुळे देवतेचा आशिर्वाद युद्धभूमीवर मिळत असल्याची मान्यता असावी. क्रेस्टच्या वरचा रानडुक्कर देखील संरक्षणाशी संबंधित असावा आणि ते वोलस्टोन आणि गिल्डन अधुनिक हेल्मेटचे प्रतिनिधित्व करते. समकालीन महाकाव्य बीओवूल्फमध्ये पाच वेळा यासारख्या हेल्मेट्बद्दल नमूद केलेले आहे. तसेच त्यात पुरुषांच्या अफाट शक्तीबद्दल लिहिलेले आहे. [१]

संदर्भ संपादन

  1. ^ Heaney 2000, पान. 91.