फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना (पुस्तक)

फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.

लेखक : - पंकज कालुवाला

प्रकाशक : - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे

पृष्ठे....134 किंमत .......200/-

मनिष्यं समाजशील प्राणी बनल्यानंतर गुन्ह्यांविषयी अधिकाधिक सजग होऊ लागला किंवा दुसऱ्या शब्दात समाजाबरोबरच गुन्हेगारीचाही उदय झाला. कारण समाजाचे आपले म्हणून नियम असतात अन् ते मोडण्याचे प्रयत्न करणारे गुन्हेगार अशी सर्वसाधारण ढोबळ अशी गुन्हेगारीची व्याख्या आहे. माणूस जितका विकसित होत गेला तितकाच गुन्हेगारीचाही विकास होत गेला हे वास्तव आहे. ती रोखण्यासाठी आता फॉरेन्सिक विज्ञानाची मदत घेतली जाते. गुन्हेशोधनासाठी ही शाखा तपासयंत्रणांना बहुमोल मदत करत असली तरी तिचं यश हे नेहमीच संमिश्रं स्वरूपाचे आहे. कारण तिच्या यशावर गुन्हेगारांची हुशारी, तपासयंत्रणांची कार्यक्षमता, कायदा व न्यायदानाच्या पद्धती इत्यादी बाबींचाही प्रभाव पडत असतो. या सगळ्या बाबी फॉरेन्सिक विज्ञानापुढे आव्हान उभे करत असतात. अशाच काही निवडक घटनांचा धांडोळा येथे घेण्यात आला आहे.

1) नेपोलियन बोनपार्टचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ?

2) अल्फ्रेड पॅकर – कोलोरॅडोचा नरभक्षक ?

3) डोनल्ड मेरेट्ट- गुन्हेगाराला गुन्हेशास्त्राची मदत

4) विलियम लॅंकेस्टरला मिळालेला अजब न्याय

5) सर हेन्री ब्रॉटन यांच्यावरील खून खटला

6) बोटाचा ठसा आणि मरिग्नी

7) डॉ. सॅम्युएल शेपर्ड्वरील तीन खटले