ख्रिस्ती विश्वासाची तत्त्वे

(प्रेषितीय सिद्धांत संग्रह या पानावरून पुनर्निर्देशित)

ख्रिस्ती विश्वासाची तत्त्वे ही ख्रिस्ती लोकांची विश्वास घोषणा आहे. यातील सर्व शब्द बायबल मधून घेतले आहेत. प्रत्येक ख्रिस्ती माणूस यावर विश्वास ठेवतो.

ख्रिस्ती विश्वासाची तत्त्वे[१]

सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्नकर्ता, त्यावर मी विश्वास ठेवतो.
आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू,जो पवित्र आत्म्याचा योगाने गर्भरूप झाला, कुमारी मारिया हीजपासून जन्मला
ज्यानें पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले,ज्याला करची दिलें, जो मरण पावला व ज्याला पुरले
जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुनः उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता, त्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला.
तेतून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो पुन्हा येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो.
पवित्र आत्मा:,पवित्र कॅथाॅलिक एक्क्लेशिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन यांविषयी मी विश्वास धरितो.
     '''आमेन'''
  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-08-24. 2017-03-07 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)