प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिन संपादन

दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी, भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.

पाकिस्तान प्रजासत्ताक दिन संपादन

दरवर्षी २३ मार्च ह्या दिवशी साजरा केला जातो. २३ मार्च १९५६ सालामध्ये संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.

इराणचा प्रजासत्ताक दिन संपादन

दरवर्षी १ एप्रिल ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.

नेपाळचा प्रजासत्ताक दिन संपादन

दरवर्षी २८ मे ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला. माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या दशकाच्या संघर्षानंतर शेवटच्या सम्राटाचा पाडाव करून २८ मे २००६ मध्ये लोकशाही स्थापन केली गेली.

बाह्य दुवे संपादन

प्रजासत्ताक दिन मराठी निबंध Archived 2021-01-22 at the Wayback Machine.