पोर्फिरियो दियाझ

(पॉर्फिरियो दियाझ या पानावरून पुनर्निर्देशित)

होजे देला क्रुझ पोर्फिरियो दियाझ मोरी (स्पॅनिश: José de la Cruz Porfirio Díaz Mori; १५ सप्टेंबर १८३० - २ जुलै १९१५) हा मेक्सिको देशाचा लष्करी अधिकारी व तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता. १८६२ मधील फ्रान्सच्या मेक्सिकोवरील लष्करी आक्रमणादरम्यान मेक्सिकोकडून लढणाऱ्या दियाझने १८७६ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्ता बळकावली.

पोर्फिरियो दियाझ

मेक्सिको ध्वज मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ नोव्हेंबर १८७६ – ६ डिसेंबर १८७६
मागील होजे मारिया इग्लेसियास
पुढील हुआन मेंदेझ
कार्यकाळ
१७ फेब्रुवारी १८७७ – १ डिसेंबर १८८०
मागील हुआन मेंदेझ
पुढील मनुएल गोन्झालेस
कार्यकाळ
१ डिसेंबर १८८४ – २५ मे १९११
मागील मनुएल गोन्झालेस
पुढील फ्रांसिस्को लेओं

जन्म १५ सप्टेंबर १८३० (1830-09-15)
वाशाका दे हुआरेझ, वाशाका, मेक्सिको
मृत्यू २ जुलै, १९१५ (वय ८४)
पॅरिस, फ्रान्स
धर्म रोमन कॅथलिक

आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये दियाझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या तसेच देशाची आर्थिक प्रगती केली. परंतु त्याने हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवल्याचे मानले जाते.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: