पेब्लाची लढाई फ्रांस आणि मेक्सिकोमध्ये ५ मे, इ.स. १८६२ रोजी झालेली लढाई होती. मेक्सिको सिटीवर चालून येणाऱ्या फ्रेंच सैन्याला काही काळाकरता थोपवून धरण्यात मेक्सिकन सैन्याला या लढाईमुळे यश मिळाले. पेब्ला शहराजवळ झालेल्या या लढाईत मेक्सिकोचे ८७ तर फ्रांसचे ४९१ सैनिक मृत्यू पावले तर दोन्हीकडील शेकडो सैनिक जखमी झाले.

इतर ठिकाणी मेक्सिकन सैन्याने सपाटून मार खाल्ला तरीही या लढाईमध्ये आपल्यापेक्षा बलाढ्य फ्रेंच सैन्याला हरविल्यामुळे मेक्सिकन सैन्याला हुरूप आला. फ्रांसला मेक्सिकोमधून हुसकावून लावल्यानंतर ५ मेचा दिवस मेक्सिकोमध्ये सिंको दि मायो या नावाने साजरा केला जातो.