पृथ्वीराज चौहान

चौहान राजा (राज्यकाळ. इ. स. ११७८-११९२)

राजपूत सम्राट पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा तराईच्या पहिल्या लढाईत पराभव केला व त्याला जीवदान दिले परंतु कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सूडापोटी गझनीचा मोहम्मद घौरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले.

पृथ्वीराज चौहान

कैदेमध्ये असताना क्रूर मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहान यांचे डोळ्यांमध्ये तप्त लाेखंडी सळ्या घालून डोळे फोडले. पृथ्वीराज चौहान व त्यांचा सेवक यांनी महंमद घोरीचा सूड घेण्यासाठी योजना बनविली व त्या योजनेनुसार सेवकाने महंमद घोरीला महाराज पृथ्वीराज चौहान यांचेकडे असलेले बाणाने शब्दभेदी लक्ष भेदण्याचे कसब आहे ते पाहण्याची विनंती केली. त्यानुसार सेवकाचे सूचनेप्रमाणे दिवस ठरला व दरबारामध्ये त्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. त्यानुसार महंमद घोरी उंच सिंहासनावर बसला होता व त्याच्या बरोबर समोर उंचावर फिरता मासा लावलेला होता आणि पृथ्वीराज चौहान दरबारामध्ये खाली उभे राहणार होते व त्यांना आवाज करणारा फिरता माशाचे लक्ष्य भेदावयाचे होते व नियोजनानुसार लक्ष्य भेदण्यासाठी महंमद घोरी आदेश देणार होता. सेवकाने दरबाराचे वर्णन महाराजांना सांगितले होते तसेच माशाच्या बरोबर मागे महंमद घोरी असेल महंमद घोरीने आदेश देताच तुम्ही मागे वळून महंमद घोरीच्या दिशेने शब्दभेदी बाण मारून त्याचा वध करण्याबाबत सर्व इत्थंभूत माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घोरी दरबारात आला तसेच पृथ्वीराज चौहान यांना देखील दरबारात आणले गेले. व त्यांना मागे असलेल्या माशाकडे तोंड करून उभे केेले गेले. पृथ्वीराज चौहानांना तयार राहण्यास सांगितले त्यानुसार महाराजांना बाण धनुष्याला लावून माशावर नेम धरून तयार झाले. आता प्रतीक्षा होती ती बाण मारण्यासाठी महंमद घोरीच्या आदेशाची. सरतेशेवटी महंमद घोरीने बाण मारण्याचा आदेश देताच महाराज पृथ्वीराज चाैहानांनी क्षणात मागे फिरून घोरीच्या कंठातून निघालेल्या आवाजाच्या दिशेने शब्दभेदी बाण सोडला आणि तो बाण घोरीच्या कंठातून आरपार झाला. अशा प्रकारे पृथ्वीराज चौहान यांनी दुष्‍ट, अन्यायी, क्रूर, लुटारू महंमद घोरीचा वध केला.अशी माहिती चांद बरदाई लिखित 'पृथ्वीराज रासो' या ग्रंथात मिळते. परंतु हा ग्रंथ समकालीन नाही आणि अनेक अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगाने भरलेला आहे.

चित्रपट संपादन

पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर अनेक पुस्तके, चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी मालिका आणि ॲनिमेशनपट निघाले, त्यांपैकी काही हे आहेत :

  • धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, स्टार प्लस चॅनेल, निर्माते - सागर आर्ट्‌स)
  • पृथ्वीराज चौहान (हिंदी पुस्तक, लेखक - दामोदर लाल गर्ग)
  • पृथ्वीराज रासो (हिंदी/अपभ्रंश महाकाव्य, कवी - चन्दवरदाई)
  • सम्राट पृथ्वीराज चौहान (हिंदी चित्रपट, १९५९; दिग्दर्शक - हरसुख यज्ञेश्वर भट्ट, पृथ्वीराज - पी.जयराज, कर्नाटकी - अनिता गुहा; संगीत - वसंत देसाई)
  • सम्राट पृथ्वीराज चौहान (हिंदी पाॅकेटबुक, लेखक - रघुवीर सिंह राजपूत)
  • पृथ्वीराज चौहान (२०२२ सालचा हिंदी चरित्रपट, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पृथ्वीराज यांच्या भूमिकेत अक्षय कुमार; संयोगितेच्या भूमिकेत मानुषी छिल्लर.