पूर्व मिडलंड्स हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या मध्य भागात मिडलंड्स भागामध्ये उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये चौथ्या तर लोकसंख्येनुसार आठव्या क्रमांकावर असलेल्या पूर्व मिडलंड्समध्ये आठ काउंटी आहेत.

पूर्व मिडलंड्स
East Midlands
इंग्लंडचा प्रदेश

पूर्व मिडलंड्सचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व मिडलंड्सचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालय मेल्टन मोब्रे
क्षेत्रफळ १५,६२७ चौ. किमी (६,०३४ चौ. मैल)
लोकसंख्या ४५,३६,०००
घनता २९० /चौ. किमी (७५० /चौ. मैल)
संकेतस्थळ emcouncils.gov.uk
नॉटिंगहॅम हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

विभाग संपादन

नकाशा औपचारिक काउंटी एकल काउंटी जिल्हे
  डर्बीशायर 1. डर्बीशायर a) हाय पीक, b) डर्बीशायर डेल्स, c) साउथ डर्बीशायर, d) एरवॉश, e) ॲम्बर व्हॅली, f)  ईशान्य डर्बीशायर, g) चेस्टरफील्ड, h) बोल्सोव्हर
2. डर्बी
नॉटिंगहॅमशायर 3. नॉटिंगहॅमशायर a) रशक्लिफ, b) ब्रॉक्सटोवे, c) ॲशफील्ड, d) जेड्लिंग, e) न्यूअर्क व शेरवूड, f) मॅन्सफील्ड, g) बॅसेटलॉ
4. नॉटिंगहॅम
लिंकनशायर
(काही भाग)
5. लिंकनशायर a) लिंकन, b) नॉर्थ केस्टेव्हन, c) साउथ केस्टेव्हन, d) साउथ हॉलंड, e) बॉस्टन, f) ईस्ट लिंडसे, g) वेस्ट लिंडसे
लेस्टरशायर 6. लेस्टरशायर a) चार्नवूड, b) मेल्टन, c) हारबोरो, d) ओडबी व विंग्स्टन, e) ब्लेबी, f) हिंकली व बॉसवर्थ, g) वायव्य लेस्टरशायर
7. लेस्टर
8. रटलॅंड
9. नॉर्थॲंप्टनशायर a) साउथ नॉर्थॲंप्टनशायर, bनॉर्थॲंप्टन, c) डॅव्हेन्ट्री, d) वेलिंगबोरो, e) केटरिंग, f) कॉर्बी, g) ईस्ट नॉर्थॲंप्टनशायर

बाह्य दुवे संपादन