पुणे स्टेशन बस स्थानक

महाराष्ट्राच्या पुणे शहरात पुणे रेल्वे स्थानकाजवळ दोन बस स्थानके आहेत.

  • १) पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन बसस्थानक.पुणे बस स्थानकाला PMT स्थानक म्हणूनही ओळखले जाते.या ठिकाणाहून पुण्याच्या विविध भागात जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.पर्यटकांसाठी विशेष काळजी म्हणून पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी "पुणे दर्शन"या नावाने एक बस दररोज सोडण्यात येते. अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा-[१]
  • २) परगावी जाण्यासाठी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन एस.टी. बसस्थानक.पुणे एसटी बसस्थानकामधून पुणे जिह्यातील गावांसाठी व जिल्ह्याबाहेरील महत्त्वाच्या गावांसाठी बसेस सुटतात. मुंबई ते पुणे या मार्गासाठी शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या वातानुकूलित बसेस आहेत, याशिवाय निम-आराम(एशियाड), किंवा साध्या दरात बसेस एसटी बस सुटतात.      याशिवाय  पुणे-फलटण या मार्गावर दर अर्ध्या तासाला बसेसची सोय आहे.