नॉर्थ सिडनी ओव्हल

ऑस्ट्रेलियामधील खेळाचे मैदान

नॉर्थ सिडनी ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधील नॉर्थ सिडनी येथे वसलेले एक बहुउपयोगी खेळाचे मैदान आहे.

नॉर्थ सिडनी ओव्हल
मैदान माहिती
स्थान नॉर्थ सिडनी, न्यू साउथ वेल्स
स्थापना १८६७
आसनक्षमता २०,०००
मालक नॉर्थ सिडनी कौन्सिल
प्रचालक नॉर्थ सिडनी कौन्सिल

यजमान संघ माहिती
नॉर्थ सिडनी बिअर्स (१९०८-सद्य)
न्यू साउथ वेल्स ब्लूज क्रिकेट ()
नॉर्थ सिडनी क्रिकेट क्लब ()
नॉदर्न सबर्ब्स रग्बी क्लब ()
नॉदर्न स्पिरिट (१९९७-२००३)
शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

मैदानाच्या खेळपट्टीचे काम ६ डिसेंबर १९८७ रोजी पूर्ण झाले, त्यामुळे हे ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे. मैदानाचे आजवर १९२९, १९३१, १९८३ आणि १९८५ अशा चार वेळा नुतनी करण करण्यात आले आहे. १९९२ मध्ये मैदानाला सिडनी क्रिकेट असोसिएशनचा "ग्राउंड ऑफ द इयर"चा पुरस्कार मिळाला.

क्रिकेट खेळाव्यतिरिक्त मैदानावर रग्बी, फुटबॉल हे खेळसुद्धा खेळले जातात. त्याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी मैदानाचा उपयोग आऊटडोअर सिनेमासाठी सुद्धा केला जातो.