नर्मदा बचाओ आंदोलन

नर्मदा नदी वाचवण्यासाठी पर्यावरण कार्यकर्त्यांचा पुढाकार

नर्मदा ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मधून वाहणारी भारतामधील एक प्रमुख नदी आहे. नर्मदा बचाओ आंदोलन हे नर्मदा नदीवर भारतातील गुजरात राज्यात बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले व मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन आहे.

चित्रपट तारकांच्या पाठिंब्यामुळे ह्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. चित्रपट नायकांमधील उल्लेखनीय नाव म्हणजे आमीर खान. या आंदोलनाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांना Right Livelihood Award [१] देऊन १९९१ मध्ये गौरवण्यात आले आहे.

नर्मदा वाचवा आंदोलनावरील पुस्तके संपादन

  1. ^ http://rightlivelihood.org/