दिलीप शंकर खैरे (आप्पा) (१७ जून, इ.स. १९७१:खंडूखैरेवाडी, सुपे, बारामती तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे बारामती तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत.

शिक्षण संपादन

खैरे यांनी पुण्यातील नेस वाडिया कॉलेज बी.कॉमची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला आले आणि त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.

कारकीर्द संपादन

ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच - २००३

भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष - २००३

भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस - २००४

भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस फेरनिवड - २००५

भाजप बारामती तालुका अध्यक्ष - २००८

भाजप जिल्हा सरचिटणीस २००८

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य - २०१०

प्रादेशिक कृषी उत्त्पन्न बाजार समिती उपसभापती - एप्रिल २०१५

पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती - डिसेंबर २०१५ पासून

पुणे जिल्हा कालवा सल्लागार समिती सदस्य - जून २०१६ संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ -२०१९ ते २०२० निमंत्रित सदस्य महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी २०२३ पासून