दुर्गा मंदिर ऐहोळे कर्नाटक मधील हे सर्वात प्रसिद्ध व भव्य मंदिर आहे.याचे विधान चापाकार आहे.मंदिराच्या बाहेरच्या बाजूस स्तंभमालिका( दिल्लीतील संसद भवन प्रमाणे)आहे.गर्भगृह, मंडप व मुख्य मंडप अशी याची रचना आहे. मंदिरातील स्तंभ चौकोनी आहेत. मंदिराचे छत सपाट आहे. मंदिराच्या भिंतीवर कोनाडे किंवा देवकोष्ट केलेली आहेत. या कोनाड्यांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. संदर्भ : प्राचीन कलाभारती, म.श्री.माटे,कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे