घृष्णेश्वर मंदिर संपादन

घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून हे ज्योतिर्लिंग वेरूळ येथे आहे औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात वेरूळ नावाचे गाव आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली या संदर्भात पद्म पुराणामध्ये कथा दिलेली आहे. घृष्णेश्वर मंदिराला धार्मिक दृष्ट्या फार महत्त्व आहे भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग असून घृष्णेश्वर मंदिर त्यापैकी एक आहे.

     घृष्णेश्वर मंदिराची रचना गर्भ ग्रह व सभामंडप याप्रमाणे आहे. हे मंदिर दक्षिण दिशेकडे मुख करून बांधलेले आहे. सभामंडपामध्ये सोळा स्तंभ आहेत गर्भ ग्रहांमध्ये काळ्या पाषाणाचे   स्वयंभू शिवलिंग आहे शिवलिंगा समोर पार्वतीची संगमरवरी दगडाची मूर्ती आहे मंदिराचे शिखर अत्यंत सुंदर आहे. सध्या शिखरावर सोन्याचा कळस आहे. मंदिराभोवती प्रशस्त आकाराचे प्रांगण आहे. मंदिराजवळ प्राचीन तळे असून त्याला शिवालय तीर्थ असे म्हणतात. राष्ट्रकूट घराण्यातील श्री कृष्ण पहिला या राजाने हे मंदिर बांधले. पुढील काळात अनेक राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मोगल काळामध्ये हे मंदिर उध्वस्त झाले होते  मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई होळकर यांनी सर्वप्रथम या जागी शिवमंदिर बांधले. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला.