दशावतारी नाटक

कोकणातील प्रसिद्ध नाट्यप्रकार

दशावतार नाटक ही कोकणची परंपरा आहे. दशावतार नाटक कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. कोकणा बरोबरच या नाटकांचे साधारीकरण गोव्यातही बऱ्याच प्रमाणात होते. ही नाटके सहसा रात्री सादर केली जातात आणि संपूर्ण रात्र चालतात. ही नाटके सहसा पौराणिक कथांवर आधारित असतात.

दशावतारी नाटकात रंगभूषा करणारा कलाकार

वैशिष्ट्य संपादन

या नाट्यप्रकारात कलाकार भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे रूप घेतात. विष्णू हा सृष्टीच्या संरक्षणाचे आणि सर्जनशीलतेचे काम पहातो. दहा अवतार म्हणजे मत्स्य , कूर्म / कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण (किंवा बलराम), बौद्ध आणि कल्की हे आहेत. शैलीयुक्त रंगभूषेशिवाय दशावतार करणारे कलाकार लाकूड आणि कागदापासून बनवलेले मुखवटे वापरतात.

 
दशावतारी नाटकात महिलेची भूमिका करणारा पुरुष कलाकार
 
दशावतारी नाटकातील एक प्रसंग
 
दशावतारी नाटकातील हनुमानाचा एक प्रसंग