ताज क्लब हाऊस (चेन्नई)

चेन्नई मधील लक्झरी हॉटेल, भारत

ताज क्लब हाऊस हे भारतातील ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेन्नई शहरातील ४थे हॉटेल आहे. याचे आधीचे नाव ताज माऊंट रोड होते. हे पंचतारांकित आरामदायी हॉटेल चेन्नईतील क्लब हाऊस रोडवर, ताज ग्रुपच्याच ताज कनेमारा हॉटेलच्या दुसऱ्या बाजूस आहे. ताज ग्रुपची चेन्नईमधील इतर होटेले - ताज कोरोमंडल, द गेटवे हॉटेल आणि ताज फिशरमन्स कोव्ह अशी आहेत.[१] हे होटेल ताज जीव्हीके हॉटेल्स आणि रिझॉर्ट्‌स लिमिटेडच्या मालकीचे आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी १.६ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. हॉटेलचे उद्‌घाटन २००८ सालच्या डिसेंबरमध्ये झाले.[२] हॉटेलचा आराखडा मॅकेन्झी डिझाइनफेज हॉस्पिटॅलिटीचे टॉम कॅटॅलो यांनी केला आहे.

ठिकाण संपादन

हे हॉटेल २, क्लब हाऊस रोड, अण्णा सलाई येथे आहे. हे चेन्नई रेल्वे स्टेशनपासून अंदाजे ४ कि.मी. आणि विमानतळापासून १९ कि.मी अंतरावर आहे. हे हॉटेल एसटी. जॉर्ज किल्ला आणि मरीना बीच जवळच आहे.

हॉटेल संपादन

हे हॉटेल ७ मजल्याचे असून त्याचे क्षेत्रफळ ४५,००० चौरस फूट आहे. दर्शनी भागावर उंच निळ्या काचा लावल्या आहेत. हॉटेलात २२० खोल्ल्या आहेत.[३] १६ स्वीट्स (खोल्यांचा संच), ३८ सुपीरियर खोल्या, १०७ डीलक्स खोल्या, ५९ प्रीमियम खोल्या त्यात समाविष्ट आहेत. स्वीट्‌समध्ये नऊ एक्झिक्युटिव स्वीट्स, ५०० चौ.फुटाचे सहा डीलक्स स्वीट्स, ६६२ चौ.फुटाचे स्वीट्स आणि ३५०० चौ. फुटाचाच्या प्रेसिडेन्शियल स्वीटचा.समावेश आहे. ३३०० चौरस्फूट आकारमान असलेला बँक्वेट हॉल तळमजल्यावर आहे. हा हॉल साधारणपने ४०० अतिथींना सामावू शकतो. येथे दोन सभागृह आहेत त्यातील एकाची ३० लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे आणि ६ व्या माळ्यावरील सभागृहाची क्षमता १२ (?) इतकी आहे..

ताज क्लब हाऊसच्या उपहारगृहातच दिवसाच्या कोणत्याही वेळी भोजनाची सोय होते. येथे पंजाबी, रावळपिंडी, सिंधी ही हिंदुस्थानी प्रकारची अन्‍ने, युरोपियन अन्न, आणि वाईन्स, मेडिटरॅनियन अन्न, ब्लेण्ड बार, ब्रेव्ह कॉफी आणि चहा, आणि दिवसभर चालणारी सॅन्डविचेस, चोकलेट्स वगैरेंची सेवा मिळते. हॉटेलच्या गच्चीवर योगा, जिम, लॅप पूल या सुविधा आहेत.

रूम्समधील व अन्य ठिकाणच्या सेवा संपादन

सर्व खोल्यांमध्ये तिजोरी, दूरध्वनी, रेफ्रिजरेटर, इस्त्री, दैनिक वर्तमानपत्रे, वायफाय, वातानुकूलित यंत्र, इंटरनेट, या रूम सेवा दिल्या आहेत.[४] रूमबाहेरील से्वांत २४ तास खुला असलेला स्वागत कक्ष, जिम, बार, अल्पोपहार, वाहनतळ, कॉफी शॉप, व्यवसाय केंद्र, LCD/प्रोजेक्टर, बॉडी ट्रीटमेंट, पोहण्याचा तलाव या सेवाही आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय लक्झरी ताज हॉटेल चेन्नईच्या ताज माउंट रोडवर सुरू केले". Archived from the original on 2013-02-09. 2016-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ "ताज हॉटेल्स रिझॉर्ट्‌स आणि पॅलेस ताज माउंट रोडवर उघडले".
  3. ^ "ताज क्लब हाऊस, चेन्नई".
  4. ^ "ताज क्लब हाऊस हॉटेलची सुविधा आणि सेवा". Archived from the original on 2015-09-11. 2016-01-13 रोजी पाहिले.