तांत्रिक विश्लेषण (रोखेबाजार)

तांत्रिक विश्लेषण (इंग्रजी :Technical analysis) अर्थशास्त्रात,रोखे बाजारातील समभाग,वायदे आणि संबंधीत जोखीमांच्या अभ्यासास किंवा विश्लेषणास तांत्रिक विश्लेषण ह्या नावाने संबोधतात.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर समभागांच्या भविष्यातील भावासंबंधीत उतार चढाव वर्तवता येतात किंवा त्यांचे अनुमान लावता येतात.त्यासाठी अशा समभागांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान बाजारभावांचा,त्यांच्या प्रमाणाचा,खरेदी-विक्रीच्या गुणोत्तराचा संदर्भ घेण्यात येतो.

तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय संपादन

तांत्रिक विश्लेषण म्हणजे बाजारातील भूतकाळातील माहिती , प्रामुख्याने किंमत आणि व्हॉल्युम ( VOLUME )  यांच्या अभ्यासानुसार वर्तमान आणि भविष्यातील किमतीच्या चढ - उताराचे पूर्वानुमान करण्यासाठीची एक विश्लेषण पद्धत. यामध्ये मार्केटने किंवा एखाद्या विशिष्ट स्टॉक / शेअर ने भूतकाळात कसे वर्तन केले यावरून आत्ताच्या परिस्थिती मधे किंवा येणाऱ्या भविष्यात ते कश्याप्रकारे वाटचाल करू शकतात याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून छोटया किंवा दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करू शकता. तांत्रिक विश्लेषण हे शेअरच्या किमतीवर काम करतेना की मूलभूत विश्लेषणा सारखे  कंपनीच्या अंतर्गत  मूल्यावर त्यामुळे यामधे शेअरची चाल लवकर लक्षात येते.

टेक्निकल इंडिकेटर्स संपादन

टेक्निकल इंडिकेटर म्हणजे तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मार्केट कश्या पद्धतीने व्यवहार करणार आहे याचा अंदाज  किंमत , व्हॉल्युम आणि इतर घटकांच्या आधारे व्यक्त करणारा एक संकेतक . यासाठी तुम्हाला थोडेफार तांत्रिक विश्लेषण येणे गरजेचे आहे ते नसेल येत तर आधी त्याची माहिती घेऊन मग पुढील माहिती अभ्यासा. आधीच्या लेखामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि टेक्निकल इंडिकेटर्सचे प्रकार याची माहिती दिली आहे 


इंडिकेटर्सचे २ प्रकार आहेत

  1. LEADING इंडिकेटर्स - कमी अवधीच्या ट्रेडिंग साठी उत्तम संकेत देते , खरेदी आणि विक्री दोन्ही बाजूचे संकेत असतात. यामधे  जोखीम ही जास्त असते OVER BOUGHT , OVER SOLD , RSI , OSCILLATOR हे काही LEADING इंडिकेटर्स आहेत.
  2. LEGGING इंडिकेटर्स - ट्रेंड नुसार चालणारे इंडिकेटर्स असतात, हे दीर्घ कालावधी साठी उपयुक्त असलेले सपोर्ट आणि रेसिस्टन्स कुठे आहे ते दर्शवितात. एकसमान वाढणाऱ्या किंवा पडणाऱ्या मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. MOVING AVERAGE , MACD हे काही लेगिंग इंडिकेटर्स आहेत

काही महत्त्वाचे इंडिकेटर्स :

  1. MOVING AVERAGE । मूव्हिंग एव्हरेज
  2. MACD  । एम ए सी डी
  3. V - WAP । व्ही - वॅप
  4. RSI  । आर एस आय
  5. SUPERTREND । सुपरट्रेंड
  6. Fibonacci retracement । फिबोनाची रेट्रेसमेंट