टिबुकली

एक पक्षी प्रजाती
टिबुकली
शास्त्रीय नाव Tachybaptus ruficollis (Pallas),
Podiceps ruficollis capensis
कुळ ग्रीबाद्य (Podicipedidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Little Grebe or Dabchick
संस्कृत लघु रक्तकंठक
हिंदी छोटी पनडुब्बी, चुरका
Tachybaptus ruficollis

आकार संपादन

टिबुकली(डॅबचिक) हा पाठीचा भाग भुऱ्या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढऱ्या रंगाचा, शेपटी नसलेला, गुबगुबीत असा साधारण कबुतराएवढा (२३ ते २९ सें. मी.) पाणपक्षी आहे. या पक्षाचे नर-मादी एरवी दिसायला सारखेच असतात. मात्र विणेच्या काळात नराच्या डोक्याचा आणि मानेचा रंग गडद तपकिरी होतो. टिबुकली पाण्यात बुडी मारते आणि काही अंतरावर गेल्यावर पाण्यातून पुन्हा बाहेर येते.[१]

वास्तव्य संपादन

टिबुकली संपूर्ण भारतासह, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान येथे जोडीने किंवा लहान थव्यात लहान-मोठ्या तलावांत, झिलाणीत राहते.

आढळस्थान संपादन

टिबुकली समुद्रसपाटीपासून सुमारे २५०० मीटर उंचीपर्यंत सर्वत्र आढळते.

प्रजाती संपादन

रंगावरून आणि आकारावरून टिबुकलीच्‍या किमान नऊ उपजाती आहेत. भारतात आढळणारी एकमेव उपजात Tachybaptus ruficollis capensis ही आहे.

खाद्य संपादन

टिबुकली हा पाणकीटक, बेडूक, अळ्या व इतर छोटे जलचर खाणारा पक्षी आहे. याचे घरटेही पाण्यात तरंगणारे व छोटे असते. ते काटक्यांचे बनलेले असते.

प्रजनन काळ संपादन

विणीचा हंगाम एप्रिल ते ऑक्टोबर असून टिबुकली मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

पहा पक्ष्यांची मराठी नावे Archived 2015-09-16 at the Wayback Machine.

चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ कसंबे, राजू. "महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी (२०१५)". २२ एप्रिल २०२० रोजी पाहिले.

[[वर्ग:पक्षी]