जोगेंद्रनाथ मंडल (२९ जानेवारी १९०४ - ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुलकाश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बसलेल्यांमध्ये डावीकडून दुसरे) यांच्यासोबत जोगेंद्रनाथ मंडल (बसलेल्यांमध्ये डावीकडून चौथे) आणि अन्य.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ विस्वास, A. K. Biswas एके (2016-09-29). "Hindu casteism led to the creation of East Pakistan". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.