जॉन नेपियर (जन्म : इ.स. १५५० मृत्यू : ४ एप्रिल, इ.स. १६१७) हा स्कॉटलंडमधील एक गणितज्ञ होता. याने गणना करण्यास उपयुक्त अशा 'लोगॅरिथम' म्हणजेच 'घातगणन' या कोष्टकाची निर्मिती केली. त्याने इ.स. १६१४ साली लिहिलेल्या 'डिस्क्रीप्शन ऑफ द मार्व्हलस कॅनन ऑफ लोगॅरिथम्स' या ग्रंथात घातगणना पद्धतीची मांडणी केलेली आहे.

जॉन नेपियर