जुगनू उपग्रह हा भारताने १२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी सोडलेला उपग्रह आहे. पीएसएलव्ही सी१८ या यानाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह अंतराळात उडवण्यात आला. केवळ ३ किलोग्रॅम वजन असलेला हा उपग्रह जगातील सर्वांत लहान उपग्रह आहे.

जुगनू
जुगनू उपग्रह
जुगनू उपग्रह
मालक देश/कंपनी इस्त्रो
निर्मिती संस्था भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
कक्षीय माहिती
कक्षा निम्न भू कक्षा
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी१८
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक १२ ऑक्टोबर, इ.स. २०११
निर्मिती माहिती
वजन ३ किलो
आकार ३४ सेमी Χ १० सेमी
कॅमेरा अवरक्त किरण कॅमेरा
उपग्रहावरील यंत्रे मायक्रो इमेजिंग प्रणाली
निर्मिती स्थळ/देश भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
बाह्य दुवे
संकेतस्थळ

निर्मिती संपादन

आयआयटी, कानपूरच्या यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख प्रा. नलिनाक्ष व्यास हे जुगनू उपग्रहाच्या विकासप्रकल्पाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ३ वर्षांत जुगनू उपग्रह बनवला आहे.

उपयोग संपादन

हा उपग्रह पूर, आपत्ती व्यवस्थापन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणार आहे. ३ किलोग्रॅम आणि ३४ सें.मी. Χ १० सें.मी. आकारमानाचा हा उपग्रह तयार करण्यास सुमारे अडीच कोटी रुपये खर्च आला असून यात उच्चप्रतीचे कॅमेरे बसविलेले आहेत. हे कॅमेरे शेती, हवामान आणि मातीच्या विविध रूपांचे छायांकन कतात. तसेच अंतराळातील मोठ्या उपग्रहांना जोडण्याचे कामदेखील हा उपग्रह करणार आहे. हवामान तसेच मोसमी पावसाबाबत अचूक माहिती देण्याचे काम तो करेल.